पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?

Ajit Pawar | मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्यांनी यावेळी देखील विजय खेचून आणला. शेळकेंना एक लाखाचं मताधिक्य मिळालं आणि ते विजयी ठरले.

शेळकेंना मंत्रीपदाचं बक्षीस मिळणार?

आमदारकीची दुसरी टर्म असलेल्या आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आता सुरू आहेत. शेळकेंना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं (Sunil Shelke) नाव आहे.

माध्यमांमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या कोणत्याही पक्षातील मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही, असं सुनील शेळकेंनी म्हटलंय.

Ajit Pawar | “मला मंत्री करण्याची अजित पवारांचीच इच्छा”

मला मंत्री करण्याची अजित पवारांचीच इच्छा असल्याचं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान दिलं जाईल. त्यानंतर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, अशी माहिती मला मिळाल्याचं शेळकेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर

“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

“मला 60 दिवसांच्या आत उचललं नाही, तर कंबोज बापाचं नाव बदलणार”

“शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे…”; मंत्रीपदाबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य

लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा