अथिया-राहुलला लग्नात मिळालेल्या कोट्यावधींच्या ‘त्या’ गिफ्ट्सबाबत सुनिल शेट्टीचा मोठा खुलासा
मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलनं(KL Rahul) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मोठ्या थाटामाटात या जोडप्याचा विवाह पार पडला. सध्या त्यांच्या लग्नाची आणि लग्नात त्यांना मिळालेल्या गिफ्ट्सची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
या लग्नात विराट कोहलीनं केएल राहुल आणि अथियाला बीएमडब्लू कार गिफ्ट दिल्याच्या चर्चा होत्या. तसेच सुनिल शेट्टीनं(Sunil Shetty) आपल्या लाडक्या लेकीला आणि जावायाला तब्बल पन्नास कोटींचं घर दिलं असल्याच्याही चर्चा होत्या.
तसेच धोनीनं अथिया-राहुलला निन्जा बाईक गिफ्ट केल्याचंही म्हटलं जात होतं. तसेच अनेकजणांनी त्यांना लग्नात महागडे गिफ्ट्स दिल्याच्या जोरदार बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.
परंतु आता या बातम्यांचे सुनिल शेट्टीनं खंडन केलं आहे. असे कोणतेही गिफ्ट्स अथिया-राहुलला मिळाले नसल्याचे सुनिल शेट्टीनं सांगितलं आहे. तसेच स्वत: सुनिल शेट्टीनंही त्यांना एवढे महागडे घर दिलं नसल्याचे स्वत: सुनिल शेट्टीनंच सांगतिलं आहे.
दरम्यान, अथिया-राहुलच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टीही होणार असल्याच्या चर्चा आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.