महाराष्ट्र मुंबई

“अहिर जरी सेनेत आले असले तरी वरळीचा पुढचा आमदार मीच…”

मुंबई | मी एका सामान्य शिवसैनिकाप्रमाणे कार्यक्रमाला आलो आहे. आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असं म्हणत वरळीचे शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी अहिरांच्या प्रवेशाने माझ्या उमेदवारीला कोणताच धोका नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी वरळीचे शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदेही उपस्थित होते.

अहिरांनी जरी सेनेत प्रवेश केला असला तरी आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असं  पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर सुनिल शिंदेंना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही, अशा चर्चांना उधाण आलं आहे. सचिन अहिर यांना वरळी ऐवजी भायखळा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

-…अन् जितेंद्र आव्हाड तोंडावर पडले; ‘ते’ ट्विट केलं डिलीट

मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या