Sunil Tatkare | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूद्ध पवार लढत होणार आहे. काका पुतण्या आणि नणंद विरूद्ध भाऊजय अशी लढत होणार आहे. यांच्यामध्ये आता पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. ते देखील अनंतराव थोपटे यांच्या भेटीसाठी गेले होते. आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे अनंतराव थोपटे यांच्या भेटीला गेले आहेत.
आधी शरद पवार यांनी घेतली थोपटेंची भेट
काही दिवसांआधी बारामती मतदारसंघातील भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. भोरमधील मतदान सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं व्हावं अशी चर्चा शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यात झाली. तेव्हा थोपटे यांनी देखील शरद पवार यांना हिरवा कंदील दाखवला.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. याआधी शरद पवार, नंतर विजय शिवतारे आणि आता सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आगामी लोकसभेआधी घडामोडींना वेग आला आहे.
विजय शिवतारे यांची भावनिक साद
विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांना भावनिक साद घातली आहे. “अजित पवार यांनी आपली भरसभेमध्ये लायकी काढली. शरद पवार यांचे जुने 40 वर्षांपासूनचे राजकीय वैर विसरू नका. मला आपली साथ हवी आहे. आपला आशीर्वाद हवा आहे,” असं म्हणत विजय शिवतारे यांनी साद घातली.
सुनील तटकरे आणि थोपटे यांची भेट
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार आहे. यासाठी सुनेत्रा पवार यांच्या मतांच्या मनधरणीसाठी अजित पवार यांच्या वतीने सुनील तटकरे अनंतराव थोपटे यांच्या भेटीला गेले आहेत. भोरमधील मतदारांना सुनेत्रा पवारांकडे वळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
सुनील तटकरे आणि अनंतराव थोपटे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आहे. याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही.
News Title – Sunil Tatkare Meet Anantrao thopate
महत्त्वाच्या बातम्या
सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात
रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले
“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा
जबरदस्त फीचर्ससह Vivo T3 5G स्मार्टफोन भारतात लाँच; या तारखेपासून विक्री सुरु
चेन्नईची धुरा मराठी माणसाच्या हातात…. ‘हा’ युवा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार