रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra

Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे दोन बडे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.

रोहित पवार, जयंत पाटील महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का? :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. मात्र अद्यापही तीनही पक्षांकडून मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्वच नागरिक संभ्रमात आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार पक्षाचे दिग्गज नेते सुनिल तटकरे यांनी त्यांच्या पक्षातील 9 आमदार आज शपथ घेतील असे सांगितले आहे.

त्यामुळे आता महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या पक्षातील 10 मंत्री असणार आहेत हे मात्र निश्चित झाले आहे. यादरम्यान सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील हे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का? यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra l सुनील तटकरे काय म्हणाले? :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार जयंत पाटील हे देखील आज महायुतीच्या मंत्र्यांसोबत शपथ घेतील अशी राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. मात्र याबद्दल बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, “हे बहुतेक गॉसिपच असावं, कारण यामध्ये तथ्य नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा कसलाही संबंध असण्याचं काहीही कारण नाही… तसेच ते आमच्या संपर्कही नाही आणि संबंधही नाही.

याशिवाय आम्ही वेगळा विचार करूनच सव्वा वर्षापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी झालो आहोत. मात्र त्या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत दिलं असल्याचं सुनील तटकरे यावेळी म्हणाले आहेत.

News Title : sunil tatkare on ncp rohit pawar jayant patil mahayuti ministers oath taking ceremony

महत्वाच्या बातम्या –

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

अवघ्या काही तासात राज्याला मिळणार नवे मंत्री; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा

ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव

मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .