रायगड | राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. कट्टर समर्थकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रघुवीर देशमुख य़ांच्या शिवसेना प्रवेशाने आमदार भरतशेठ गोगोवले यांचं पारडं जड होणार असल्याचं बोललं जात आहे.
रघुवीर देशमुख यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा होईल, अशी अपेक्षा भरत गोगोवले यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, विकासकामांना चालना देण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं रघुवीर देशमुख यांनी सांगितलं आहे. तसेच सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसकडून 9 वेळा खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याची कन्या शिवबंधनात अडकणार???
-शिवसेना सोडून नारायण राणेंनी चूक केली- नितीन गडकरी
-खेकड्यांनंतर तेजस ठाकरेंनी शोधल्या या प्राण्याच्या दोन नव्या प्रजाती!
-विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही- शरद पवार
-पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं- नारायण राणे
Comments are closed.