बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई | नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेतायत. तर आता राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

सुनिल तटकरे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिलीये. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “काल माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.”

ते पुढे म्हणतात, “माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.”

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुनिल तटकरे यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तसंत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप

FAU-G गेमचा टीझर लाँच, नोव्हेंबरमध्ये येणार भारतीयांच्या भेटीला

“स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलली”

“मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून फिरतो, मी थकलो आहे”

बिहारमधील अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे- सोनिया गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More