Sunita Ahuja | बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) सध्या चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. 37 वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे. गोविंदा आणि सुनीता अनेक कारणांनी चर्चेत असतात, मात्र यावेळी सुनीता यांनी दिलेल्या एका वक्तव्यामुळे हा विषय आणखी गाजू लागला आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी गोविंदाच्या अफेअर्स आणि त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
गोविंदाच्या अफेअर्सबाबत सुनीता काय म्हणाल्या?
गोविंदा आणि सुनीता यांनी 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं होतं. या विवाहाला 37 वर्ष पूर्ण झाली असून, या काळात सुनीता यांनी पत्नी म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मात्र, त्यांच्या नात्यावर अनेकदा अफेअर्सच्या चर्चा झाल्या. सुनीताला याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मनमोकळं उत्तर दिलं.
त्या म्हणाल्या, “लग्नाआधी आणि नंतरही गोविंदाचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यावेळी मला मनावर दगड ठेवावा लागायचा. पण तो सतत कामात व्यस्त असायचा, सलग शूटींग करत राहायचा. त्यामुळे त्याला अशा गोष्टींसाठी वेळ मिळायचा नाही.”
“या वयात मन विचलित होतं…”
सुनीता (Sunita Ahuja) पुढे म्हणाल्या, “गोविंदा आता 60 वर्षांचा आहे आणि अभिनयापासून दूर आहे. आता मला खरी भीती वाटते, कारण त्याच्याकडे खूप रिकामा वेळ आहे. या वयात लोकांचं मन विचलित होतं. त्यामुळे तो कोणत्या तरी लिंक-अपमध्ये अडकू नये, अशी मला काळजी वाटते.” त्यांच्या या वक्तव्यानंतर, त्यांनी आपल्या मनातील भावना स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे.
गोविंदा एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा
सध्या चर्चेत असलेल्या अहवालांनुसार, गोविंदा एका 36 वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र, या गोष्टीत कितपत सत्य आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लग्नाच्या 37 वर्षांनंतर दोघे विभक्त होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Title : Sunita Ahuja Opens Up on Govinda’s Alleged Affairs