बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सनी लिओनी म्हणते,”हा प्रसिद्ध चित्रकार कोण?”; अनिल कपूरनं दिलं भन्नाट उत्तर

मुंबई | दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा 2007 साली वेलकम (WELCOME Movie) नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपट भरपूर गाजला. आजही हा चित्रपट अनेकांना आवडतो. या चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, कॅटरिना कॅफ यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाची अनिल कपूर म्हणजेच मजनू भाईची पेंटिंग भलतीच व्हायरल झाली होती.

मजनू भाईच्या या पेंटिंगवर अनेक मिम्स देखील बनले आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने ही पेंटिंग तिच्या इनस्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या फोटोत सनीने थम देखील दिला आहे. त्याचबरोबर तिच्या मांडीवर तिने मजनूची पेंटिंग देखील ठेवली आहे आणि ओळखा हा प्रसिद्ध पेंटर?, असं कॅप्शन देखील सनीने दिलं आहे. त्यावर अनिल कपूरने मजेशीर उत्तर दिलं.

Majnu Bhai’s art is world famous in India म्हणजे मजनू भाईची कला भारतात जगप्रसिद्ध आहे, असं अनिल कपूर म्हणतो. त्याचसोबत खदाखदा हसतानाचा इमोजी देखील त्याने याला दिला आहे. अनिल कपूरच्या या पोस्टला अनेकांनी लाईक देखील केलं आहे. अनेक काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, वेलकममधील हे चित्र खुप प्रसिद्ध झालं होतं. यात एका घोड्यावर गाढवाला स्वार होताना दाखवण्यात आलं होतं. आता सनी लिओनीमुळे हे चित्र पुन्हा प्रसिद्ध झालं आहे.

पाहा पोस्ट-


थोडक्यात बातम्या-

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

भारतीय सैन्याला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा खात्मा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महागाईने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली

दिल्लीत नेमकं शिजतंय काय? शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More