बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलमधील या संघाने कोरोना बाधितांसाठी दिले तब्बल 10 कोटी

मुंबई | जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसने सर्वांना चिंतेत टाकलं आहे. त्यामुळे या व्हायरसला लवकरात लवकर नष्ट करण्यासाठी उद्योगपती, बॉलिवूडमधील स्टार आणि समाजसेवक आपापल्यापरीने जमेल ती मदत करत आहेत. अशातच आयपीएलमधील फ्रंचायझीही मदतीसीठी सरसावले आहेत.

सन टीव्ही समूह कोरोना व्हायरसच्या या लढाईत 10 कोटी रुपयांचे योगदान देत आहे, असं ट्विट  केलं आहे. सनरायजर्स हैद्राबादने  संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहितू दिली आहे.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आयपीएल फ्रंचायझी किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलला 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र देशातील परिस्थिती पहाता आयपीएल सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या भारतात कोरोना बाधितांची संख्येने 6000 चा आकडा पार केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

“महाराष्ट्र श्रीमंत आणि वजन असलेल्या लोकांसाठी लॉकडाउन नाही का?”; वाधवान कुटुंब महाबळेश्वरला फिरायला!

  महत्वाच्या बातम्या-

  इस्लामपूर कोरोनामुक्त…. जयंत पाटील चिंतामुक्त!

  पुण्यातल्या 5 जणांची कोरोनावर मात; महापौर मोहोळ यांची माहिती

  गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून पत्र देणे हे अशक्य, गृहमंत्र्यांनी लगोलग राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील

  Comments are closed.

  This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More