बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधी भारतीयच; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावलं

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी झाली असून राहुल गांधी भारतीयच असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

एखाद्या परदेशी कंपनीत नागरिकत्व ब्रिटश असल्याचे नमूद असल्यास व्यक्तीचे नागरिकत्व ब्रिटीश असतेच असं नाही, असं म्हणत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.

युनायटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेने या संदर्भात याचिका दाखल केली होती. अन्य पुरावे सादर करुन न शकल्याने याचिका फेटाळण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही राहुल गांधींचे ब्रिटीश नागरिकत्व असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या

-राजीव गांधींच्या हत्येला भाजपच जबाबदार; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

-प्रचारादरम्यान दुकाणदाराकडून अनुपम खेर यांची फजिती!

-ब्रिटनमध्येही ‘सैराट’चा फिवर; ब्रिटनच्या राजपुत्राचं नाव ‘आर्ची’!

-हयात नसताना राजीव गांधींवर टीका करणे योग्य नाही- शरद पवार

-सुरेंद्र गडलिंग यांनी नक्षलवाद्यांना माहिती पुरवली; पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More