बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडीओ

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकातामधील सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स यांनी केेलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताला विजयासाठी 206 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकत कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीची सुरूवात मात्र निराशाजनक झाली.

कर्णधार विराट कोहली स्वस्तात परतला त्याने चक्रवर्तीने माघारी धाडलं. वरुण टाकत असलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराटने ऑफ साईडला एक उंच फटका खेळला. तिथे तैनात असलेला कोलकाताचा क्षेत्ररक्षक राहुल त्रिपाठीने मागे धावत जाऊन हा झेल टिपला.

त्रिपाठीने घेतलेल्या झेलमुळे त्याचं कौतूक होेत आहे. विराट कोहली खेळपट्टीवर स्थिरावला की समोरच्या संघला सळो की पळो करून सोडतो. मात्र राहुलने अफलातून झेल घेत त्याला तंबूत धाडलं. विराट गेल्यानंतर बँगलोरची दुसरू विकेटही लवकर गेली. मात्र त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक पवित्रा घेत संघाला सावरत कोलकाताच्या गोलंदाजांचा घाम फोडला.

दरम्यान, कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर एबी डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये नाबाद 76 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली.

 

थोडक्यात बातम्या- 

डोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का

आशा आहे 2 मेपर्यंत पाय ठीक होईल, निदान राजीनामा देण्यासाठी तरी चालत जाता येईल- अमित शहा

‘कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी…’; शरद पवारांनी केलं ‘हे’ आवाहन

‘प्लीज मदत करा’, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड

केंद्र सरकारवर बालीश आरोप करणं बंद करा आणि कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More