सुपर ओव्हरचा थरार, मुंबईची गुजरातवर 5 धावांनी मात

राजकोट | यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या सुपर ओव्हरचा थरार मुंबई आणि गुजरातमध्ये पहायला मिळाला. या अटीतटीच्या सामन्याच मुंबईने गुजरातचा 5 धावांनी पराभव केला.

गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईसमोर 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रवींद्र जडेजानं अखेरच्या चेंडूंवर कुणाल पंड्याला धावचित केलं. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला.

सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने गुजरातसमोर 12 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातला हे आव्हान पेलवलं नाही.  तत्पूर्वी, गुजरातकडून पार्थिव पटेलनं 44 चेंडूत 70 धावांची तर मुंबईकडून इशान किशननं 35 चेंडूत 48 धावांची खेळी केली.