बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रतिक्षा संपली! सुपरडुपर हिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार!

मुंबई | साउथ सुपरस्टार अल्लु अर्जुन (South Superstar Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या पुष्पा चित्रपटाने थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे. थिएटर्सनंतर आता पुष्पा चित्रपट ॲमेझॉन प्राईम या डिजीटल प्लॅटफॉर्मवरही रिलीज करण्यात येणार आहे. शुक्रवारी म्हणजेच 7 जानेवारीला हा चित्रपट ॲमेझॉनवर रिलीज होणार आहे.

ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तेलगु, मल्ल्याळम, तामिळ आणि कन्नड भाषेतून रिलीज होणार आहे. रात्री 8 वाजता हा चित्रपट स्ट्रिम केला जाणार आहे. पुष्पा चित्रपटाने अगोदरचं 60 करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. 17 डिसेंबरला हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर चित्रपटाने तुफान कामगिरी केली आहे.

पुष्पा चित्रपटात अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत आहेत. तर प्रकाश राज जगपती बाबू, धनजंय, अनसूया भारद्वाज, हरिश उथमन आणि वेनेला किशोर साहाय्यक भूमिकेत आहेत. सुकूमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

दरम्यान, पुष्पा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर रिलीज करण्याबाबत ॲमेझॉनने घोषणा केली आहे. मात्र चित्रपट हिंदी भाषेत रिलीज करण्याबाबत कोणतीही घोषणा ॲमेझॉनने केलेली नाही. त्यामुळे चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार का याबाबत अजूनही शंका आहे.

थोडक्यात बातम्या-

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

‘या’ तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा, हवामान विभागाचा इशारा

‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस, नवी नियमावली जाहीर

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, मोफत वडापाव खा’; ‘या’ ठिकाणी राबवला जातोय अनोखा उपक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More