रेल्वेचा झोल, ‘सुपरफास्ट’च्या नावाखाली प्रवाशांची कोट्यवधींची लूट

रेल्वेचा झोल, ‘सुपरफास्ट’च्या नावाखाली प्रवाशांची कोट्यवधींची लूट

मुंबई | सुपरफास्ट ट्रेनच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करते, मात्र ९५ टक्के रेल्वे वेळेवर पोहोचत नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आलीय. 

जर रेल्वे सुपरफास्ट वेगाने धावत नसतील तर ही प्रवाशांची लूट आहे. प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळायला हवे, असा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. 

दरम्यान, उत्तर सेंट्रल रेल्वे आणि दक्षिण सेंट्रल रेल्वेने ‘सुपरफास्ट’ च्या नावाखाली प्रवाशांकडून तब्बल ११.१७ कोटी रुपयांची वसुली केली. परंतु, या दोन्ही रेल्वे मार्गावरील ‘सुपरफास्ट’ रेल्वे ९५ टक्क्याहून अधिक वेळा उशिराने पोहोचल्या.

Google+ Linkedin