बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

मुंबई | लहानपणी असताना सुपरहिरो म्हटलं की ‘सुपरमॅन’ आवर्जुन आठवायचा. याच सुपरमॅनला मोठ्या पडद्यावर आणणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर रिचर्ड डोनर यांचं दुखःद निधन झालं आहे. काल 5 जुलै रोजी त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

रिचर्ड डोनर यांच्या पत्नी आणि फिल्म निर्मात्या लॉरेन शूलर डोनर यांनी याविषयी माहिती दिली आहे. दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांच्या निधनाची बातमी पसरताच हॉलिवूडमध्ये शोककळा परसली आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

80च्या दशकात 1978 साली प्रदर्शित झालेल्या सुपरमॅन चित्रपटाचं रिचर्ड डोनर यांनी दिग्दर्शन केलं असून या चित्रपटासाठी त्यांनी त्यावेळी तब्बल 1 मीलीयन डॉलर इतकं मानधन घेतलं होतं. सुपरमॅनसोबत त्यांनी ‘द गोनीज’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं.

दरम्यान, सुरवातीला रिचर्ड यांना अभिनेता बनण्याची इच्छा होती. मात्र, नंतर त्यांनी दिग्दर्शनाचा मार्ग निवडला. 1950 साली त्यांना डेसिलुची जाहीरात करण्याची संधी मिळाली. टीव्ही क्षेत्रात सुद्धा 125 क्लासिक शोसाठी त्यांनी दिग्दर्शन केलं. त्यांच्या निधनानं कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधलं सगळ्यांच लक्ष

काँग्रेसला धक्का! काँग्रसचे माजी मंत्री राहिलेले ‘हे’ नेते होणार भाजपवासी

“30 वर्ष युती होती तेव्हा काही झालं नाही आणि आता एकत्र आल्यावर काय होणार आहे?”

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More