बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट!

चेन्नई | सुपरस्टार रजनीकांत यांना तब्येतीच्या कारणामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांना अचानक चक्कर आल्याने चेन्नईतील कोवेरी रूग्णालयात नेऊन रुटीन चेकअप करण्यात आलं. पण त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रियेची माहिती रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली होती.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रजनीकांत यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यामुळे रजनीकांत यांचे चाहते मात्र चिंताग्रस्त झाले होते. पण आता रजनीकांत त्यांची दिवाळी घरी साजरी करणार आहेत. रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधार असून त्यांना आता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रजनीकांत यांच्यावर कॅरोटिड आर्टेरी रिवास्कुलराईजेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदुला होणारा रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. रजनीकांत यांच्यावर ही शस्तक्रिया यशस्वीपणे पार पडल्यावर डॉक्टरांनी त्यांना लवकरच डिस्चार्ज देऊ, अशी माहिती दिली होती

त्यानुसार आता रजनीकांत यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रूग्णालयात दाखल होण्याच्या काही दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यापूर्वीही रजनीकांत यांना तब्येतीच्या कारणामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

“चेंबुरमधील ‘तो’ व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More