बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

चेन्नई | सर्वांचे लाडके सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांना चक्कर आल्याने त्यांना 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांना चक्कर आल्याने आधी त्यांचं रुटिन चेकअप करण्यात आलं होतं. पण रजनीकांत यांच्या तब्येतीबाबतची महत्वाची माहिती आता समोर येत आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढणार आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला. रजनीकांत यांच्यावर शुक्रवारी महत्वाची शस्त्रक्रिया पार यशस्वीरित्या पार पडली आहे. रजनीकांत यांच्यावर कॅरोटिड आर्टेरी रिवास्क्युलराईजेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मेंदुला होणारा रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.

रजनीकांत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती कावेरी रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. एक परिपत्रक जारी करत रजनीकांतच्या तब्येतीची माहिती देण्यात आली आहे. रजनीकांत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहितीही रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रजनीकांत सध्या रूग्णालयातच असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.

याआधीही एकदा रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 25 डिसेंबर 2020 रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना लगेच 27 डिसेंबरला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा रजनीकांत रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रजनीकांत दाखल आहेत त्या रूग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

“…तर येणाऱ्या काळात मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More