पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तब्बल ‘एवढ्या’ लाख रुपयांचा गंडा
पुणे | पैशाच्या लोभातून अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडतात. पैशाचा पाऊस पडण्याची अंधश्रद्धा आजही समाजात कायम असल्याचं पाहायला मिळतं. अशातच पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याला तब्बल 52 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
जालन्यातील मांत्रिक किसन पवार माझ्याकडं दैवी शक्ती असल्याचं सांगून पैशाचा पाऊस पाडतो असं आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. पैशांचा पाऊस पाडून देतो. त्यासाठी पूजा करावी लागेल व त्यात काही पैसे ठेवावे लागतील, असा बनाव करून त्यानं व्यावसायिकाला 52 लाख रुपयांना गंडा घातला आहे. पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकानं 52 लाख रुपये मांत्रिकाला दिले. मात्र पैशांचा पाऊस न पाडता मांत्रिकानं आणखी पैशांची मागणी केल्यानं व्यावसायिकानं पोलिसांत धाव घेतली.
सलग तीन वर्षे हा सगळा प्रकार सुरू असताना विश्वास दाखवण्यासाठी मांत्रिकानं खेळणीतील पैशाचा वापर केला. नोटांचा पाऊस पाडल्याचं भासवून व्हिडीओ आणि फोटो चित्रित करत व्यवसायिकाला पाठवत होता. मात्र त्रस्त झालेल्या व्यावसायिकानं पुणे पोलिसांत अखेर धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन मांत्रिकावर विविध गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या आहे.
दरम्यान, एकीकडं जग वैज्ञानिक क्रांतीतून पुढे जात आहे. पण काही जण अजूनही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं दिसतय. पैशांचा पाऊस पडणं, गुप्तधनाच्या नावाखाली होणारे किळसवाणे प्रकार थांबण्याची गरज आहे.
थोडक्यात बातम्या –
‘एम्स’च्या अभ्यासातून मोठा दिलासा! लसीकरणानंतर पुन्हा कोरोना झाल्यास…..
माणसांनंतर प्राण्यांनाही कोरोनाचं ग्रहण! कोरोनाने देशातील पहिला ‘या’ प्राण्याचा मृत्यु
कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ
अंधश्रद्धेचा कळस! अंधश्रद्धेतून आजारी बालकाला दिले पोटावर गरम विळ्याचे चटके
नोकरीचं अमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू महिलेवर केला बलात्कार
Comments are closed.