मुंबई | केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरु आहे.
पहाटे 5.30 वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने पुण्याहून मुंबईत आणला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. इथून तो मुंबईतील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरणासाठी पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा
राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…
“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”
धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र
धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…