बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन शर्थीचे प्रयत्न करून कोरोना रोखण्यासाठी रात्रीचा दिवस करताना पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यामधून एका अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

पुण्यातील जंबो कोविड सेंटर येथील काही रुग्णांना त्यांचे नातेवाईक तंबाखू आणि गुटखा पुरवत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे कोरोना संक्रमणामुळे लोकांचा जीव जातोय तर दुसरीकडे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना आपल्या सवय काही केल्या कमी करता येत नाहीत.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना नातेवाईकांकडून जेवणाचा डबा येतो या डब्यांमध्ये गुटखा आणि तंबाखूच्या पुड्या देऊन नातेवाईक चक्क रुग्णाला रुग्णालयात तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कोरोनासारख्या गंभीर आजाराशी तोंड देतानाही लोकांना आपल्या आणि इतरांच्या तब्येतीची काळजी नसून कोरोना आणखी कसा वाढेल, या दृष्टीनेच कृती करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. घरून डबा देण्याची मुभा देण्यात आल्याने काही जण याचा गैरफायदा घेत असताना चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे नेमके काय होणार आणि हा प्रकार थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘पीएम केअरचा पैसा बाहेर काढा’; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुलं पत्र

‘…म्हणून भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं कारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 6 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

आनंदाची बातमी… पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More