आदिलविरोधात लढण्यासाठी राखीला ‘या’ पक्षाचा पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan) गंभीर आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आदिलची चौकशी होत आदिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राखी आता लढत असून या लढाईत राखीला एका राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास(Ramdas Athvale) आठवले यांंनी राखीला पाठिंबा दर्शवला आहे. राखी प्रकरणावर वाहिद आली खान यांच्याशी रामदास आठवलेंनी बातचीत केली. तेव्हा आठवले म्हणाले, ”राखीशी माझे चांगले संबंध आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आदिलनं राखीप्रमाणं इतर महिलांनादेखील फसवलं आहे.”

आदिलविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. आदिलनं राखीवर आत्याचार केला आहे. त्यानं तिचं पैसे दागिने घेतले आहेत. त्यामुळं आदिलला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. रिपब्लिकन पार्टीचा (Republican Party) राखीला पाठिंबा आहे. राखीला न्याय मिळायला हवा. असंही पुढे आठवले म्हणाले.

या प्रकरणात रिपब्लिक पार्टीकडून राखी सावंतला न्याय मिळावा यासाठी आंदोलनही करण्यात येणार होतं. परंतु पोलिसांची परवानगी घेतली नसल्यामुळं आंदोलन ऐनवेळी रद्द करावं लागलं असल्याचं आठवलेंनी सांगितलं आहे. आठवलेंनी राखीला त्यांचा व त्यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राखी प्रकरणावर वाहिद अली खान यांच्याशी रामदास आठवलेंनी बातचीत केली. याचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आठवले म्हणाले, “राखी सावंत एक उत्तम अभिनेत्री आहे. संपूर्ण देशभरात ती प्रसिद्ध आहे. माझ्याशीही तिचे चांगले संबंध आहेत. आमच्या पक्षाशी ती जोडली गेली आहे. आदिल खानने राखी सावंतला फसवलं आहे. त्याच्याविरोधात राखीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आदिलने राखीप्रमाणेट इतर महिलांनाही फसवलं असल्याच्या तक्रारी आहेत”.