पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पुंगी बजाओ आंदोलन केलं.
शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या, मदत करणाऱ्या संघटनेला आमचा संपुर्ण पाठिंबा अाहे. तसंच मालाची नासधूस करू नका अन्न वाया घालू नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन यावर तोडगा काढायला हवा. तसंच गुजरात सरकारनं तिथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटींचं पॅकेज दिलंय, तर महाराष्ट्र सरकारला द्यायला काय धाड भरलीय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही.यामुळेच @NCPspeaksने पुण्यात आंदोलन केले.या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला pic.twitter.com/1FFob2yZma
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2018
शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दूधासाठी हक्काचा दर तो मागतोय. @CMOMaharashtra तुम्ही जागे व्हायलाच हवे. यासाठीच आज @NCPspeaks च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दूध दराच्या या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा आहे. pic.twitter.com/y14IO7bZml
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण
-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव
-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी
-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली