बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

लातूर | आपल्या राज्यात पंढरपूरला एक अधिष्ठाण प्राप्त आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीत अवघा महाराष्ट्र तल्लीन असतो. राज्यातील कोणत्याही संकटात राज्यातील जनतेला आधी पंढरीच्या पांडुरंगाची आठवण येते. सध्या मराठवाड्याला पावसानं पार उद्धवस्त केलं आहे. परिणामी भाजपतर्फे लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात आता वारकरी सांप्रदायानं पाठिंबा दिला आहे.

राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला निलंगा येथील वारकरी सांप्रदायानं पाठिंबा दिला आहे. मराठवाड्यात यावर्षी जोरदार पाऊस झाला होता. सतत दुष्काळानं होरपळण्याऱ्या मराठवाड्यात यावर्षी पावसानं चांगलाच धुमाकुळ घातला होता.

मराठाड्यातील 38 लाख हेक्टर शेतातील पिकांचं पुरतं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारनं लवकरात लवकर मदत करावी यासाठी विविध संघटना सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. भाजपच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून  विविध संघटना पाठिंबा देत आहेत. अशातच आता वारकरी सांप्रदायानं पाठिंबा दिल्यानं सर्वांचं लक्ष या आंदोलनाकडं लागलं आहे.

दरम्यान, लातूर हा काॅंग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख हे सध्या लातूरचे पालकमंत्री आहेत. परिणामी या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने थेट बाभळगावच्या गढीला आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. आमदार संभाजी पाटील यांनी 72 शेतकऱ्यांना सोबत घेऊन 72 तास अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More