बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई | ओबीसी आरक्षणासंदर्भात (Obc Reservation) एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. तसचं आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाने आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला 10 टक्के आरक्षण लागू करण्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यामुळे पीजी-नीट समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्यानं या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्यासाठी अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा असायला हवी, अशी याचिका याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडली होती. केंद्र सरकारने कोणताही अभ्यास न करता आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आठ लाख उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे. असा युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी न्यायालयात केला होता.

दरम्यान, जून महिन्यात केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरक्षणाला मंजूरी देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेसंबधी निर्णय मार्च महिन्यात देणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस, नवी नियमावली जाहीर

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, मोफत वडापाव खा’; ‘या’ ठिकाणी राबवला जातोय अनोखा उपक्रम

“ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीला मात्र…”, भर कार्यक्रमात रोहित पवारांचा पंकजांना टोला

‘माई, तुझ्या प्रेमाला…’, गुगलनं अनोख्या पद्धतीनं वाहिली श्रद्धांजली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More