बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी व केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचे पुत्र आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांचा मंजूर करण्यात आलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे.

10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन मंजूर केला होता. यानंंतर लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द ठरवला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना आठवड्याभरात तुरूंगात परतण्याचे आदेश दिले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या याचिकेवर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस.व्ही. रमणा यांनी 4 एप्रिल रोजी या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर या प्रकरणातील निकालाचं आज वाचन करण्यात आलं असून सर्वोच्च न्ययालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी

धक्कादायक! शिवसेना आमदाराच्या पत्नीने राहत्या घरी घेतला गळफास

पोस्टाची भन्नाट योजना; सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आत्ताच गुंतवा पैसे

“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”

“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More