Electoral Bonds | मागील काही दिवसांपासून देशाचे राजकारण इलेक्टोरल बाँड या विषयावरून चांगलेच तापले आहे. याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात इलेक्टोरल बाँड प्रकरणावर सुनावणी झाली. (Supreme Court on Electoral Bonds) न्यायालयाच्या घटनापीठाने इलेक्टोरल बाँडच्या युनिक नंबरच्या खुलासाबाबत सुनावणी करताना स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले आहे. (Electoral Bond Case) एसबीआयने अलीकडेच आकडेवारी जाहीर करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने वेळ वाढवून मागितली होती. यावरून एसबीआयला न्यायालयाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, एसबीआयला प्रत्येक आवश्यक माहिती द्यावी लागेल. यावर एसबीआयने बदनामी होत असल्याचे म्हटले आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने अलीकडेच त्यांच्या वेबसाइटवर इलेक्टोरल बाँडची माहिती अपलोड केली आहे, मात्र त्यात बाँड क्रमांक नाही.
“SBI ला माहिती द्यावीच लागेल”
गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांबाबत सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने बाँडचा विशिष्ट क्रमांक जाहीर न केल्याबद्दल एसबीआयला प्रश्न विचारला होता. एसबीआयने युनिक नंबर उघड करावा, कारण ते तसे करण्यास बांधील आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते.
जर स्टेट बँक ऑफ इंडियाने न्यायालय म्हणत असलेला युनिक नंबर उघड केला तर संपूर्ण माहिती समोर येईल. एकूणच कोणत्या व्यक्तीने कोणत्या राजकीय पक्षाला किती देणगी दिली हे स्पष्ट होईल. युनिक नंबरद्वारे, देणगी कोणत्या राजकीय पक्षाला दिली होती आणि देणगी देणारी व्यक्ती अथवा कंपनी कोण होती हे कळू शकते.
Electoral Bonds: Supreme Court directs SBI to disclose all details of Electoral Bonds in its procession, including the unique alphanumeric number and the serial number, if any, of the bonds redeemed.
Supreme Court directs the SBI Chairman to file an affidavit by 5 pm, Thursday… pic.twitter.com/hPu9ICCRRm
— ANI (@ANI) March 18, 2024
Electoral Bonds प्रकरणी सुनावणी
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या घटनापीठासमोर निवडणूक रोख्यांच्या युनिक नंबरच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी एसबीआयच्या वतीने उपस्थित असलेले वकील हरीश साळवे यांना सांगितले की, आम्ही संपूर्ण तपशील देण्यास सांगितले आहे. पण SBI ने निवडक माहिती दिली आहे. त्यांना असे करता येणार नाही. त्यावर साळवे म्हणाले की, आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत.
तसेच चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या आदेशाची वाट पाहू शकत नाही, आम्ही न्यायालय जे म्हणेल ते करू. तुम्हाला आदेश समजायला हवा होता. यावर हरीश साळवे म्हणाले की, एसबीआयबाबत चुकीची प्रतिमा निर्माण केली जात आहे. आदेशात काय लिहिले होते ते आम्हाला स्पष्ट करायचे आहे. आम्हाला समजले की, आम्हाला बाँडची तारीख, बाँड खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, रक्कम आणि रोख रक्कम मिळविणाऱ्या व्यक्तीचे तपशील देण्यास सांगितले आहे. आम्हाला युनिक नंबरबद्दल काही कल्पना नव्हती.
News Title- Supreme Court hearing on Electoral Bonds and Chief Justice DY Chandrachud slams State Bank of India and says SBI is defaming us
महत्त्वाच्या बातम्या –
LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!
“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका
‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट
फोक्सवॅगन कंपनीची इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालणार? एका चार्जमध्ये धावणार तब्बल 600 किमी
“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली