Top News देश

मराठा आरक्षणावर आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी!

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाची सुनावणी येत्या 25 जानेवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र आजच घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणी 20 डिसेंबर 2020 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. त्यावेळी मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद करत, ‘शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं मुकुल रोहतगी यांनी सांगितलं.

ही सुनावणी अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेलं घटनापीठापुढं झाली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार की, नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलं ‘हे’ नवीन नाव!

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या