अजित पवारांना पक्ष चिन्हावरून मोठा झटका!

Ajit Pawar

Ajit Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी 40 आमदारांना घेऊन ते भाजपाबरोबर महायुतीत सामील झाले. मात्र त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयान झटका दिला आहे.

Ajit Pawar l 36 तासांचा अल्टिमेटम :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या
विरोधात सर्वोच्च न्यायालयात पक्ष चिन्हाबाबत धाव घेतली होती. मात्र त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तब्बल 36 तासांचा अल्टिमेटम देखील दिला आहे.

त्यामुळे आता येत्या 36 तासांत उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रांत छापायची आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे की, पुढील 36 तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाचाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल.

तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं या अस्वीकरण पत्रकात असणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन देखील दिले आहे .

News Title – Supreme Court Hearing on NCP Clock Symbol

महत्त्वाच्या बातम्या-

नणंद बाईकडे कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा कोणावर हल्ला?

शरद पवार ‘महाराष्ट्र’ तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी मतदारांना शिवीगाळ केली…; भाजपचा हल्लाबोल

भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ

लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .