शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश

Supreme Court hearing on NCP Party Symbol

NCP | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे घड्याळ चिन्ह गोठवा अशी मागणी करणारी याचिका  शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याचा आता निर्णय समोर आला आहे. (NCP)

तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अजित पवार गटाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. या याचिकेवर 7 नोव्हेंबररोजी सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल 36 तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज 13 नोव्हेंबरला या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली आहे.

अजित पवारांना दिलासा

आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार पक्षाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. अजितदादा गटाचे (Ajit Pawar NCP) घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. या मागणीला न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरं जावं, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत.आता याबाबत पुढची सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. (NCP)

आज न्यायालयात नेमकं काय घडलं?

अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. आजच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.आम्ही बारामतीत फिरवत असलेल्या गाड्यांवर न्यायप्रविष्ठ असल्याविषयीची जाहिरात दिली आहे , असं अजित पवार गटाच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

तसेच, घड्याळ चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर अजित पवार गटाचे वकील आणि शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यात खडाजंगीही झाली. अजित पवार आणि शरद पवार यांचे वैचारिक मतभेद आहेत. तसेच दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे व्हिडीओ किंवा फोटो वापरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (NCP)

News Title –  Supreme Court hearing on NCP Party Symbol

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट

गुड न्यूज! तब्बल 5 हजारांनी सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राणेंची पुन्हा दमदाटी, उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेवण्यापूर्वीच दिलं ओपन चॅलेंज

“निवडणूक संपण्याची वाट बघतोय, नंतर..”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .