प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई | निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. या संदर्भात त्यांना त्यांची बाजू मांडण्यास कोर्टाने सांगितलं आहे.

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील 2 फौजदारी गुन्ह्यांचा समावेश केला नव्हता, यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका कोर्टात करण्यात आली होती.

या दोन प्रकरणात फडणवीस यांनी हेतूपुरस्पर माहिती दडवली. त्यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदारांचा हक्क डावलण्यात आला आहे, असं याचिकेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या याचिकेवर कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने मुख्यमंत्र्याना याबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!

-महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

-काॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर

-काँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार

-शुभमंगल सावधान… ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबंधनात