बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली | गेले अनेक दिवस पक्षीय बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच लोकांनी एकामागे एक धक्के दिले होते. त्यात आता त्यांना न्यायालयाने आधार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नोटीस विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने होकार दिला आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला आणि शिवसेनेला पक्षांतर्गत सुरु असलेल्या कारवायांचे लेखी पत्र देण्यास सांगितले होते. मात्र हा आदेश घटनाबाह्य आणि घाईघाईने न्यायालयाने दिला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, या निर्णाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. तिच्यावर आता सर्वोच्चा न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या इतर खटल्यांबरोबर सुनावणी होणार आहे.

शिंदेंच्या बंडनंतर शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी या मा शिंदे गटाने न्यायालयात आव्हान केले. बंडखोरांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना मुख्य निवडणूक आयोग (Election Commission of India) खरा शिवसेना पक्ष कोणता हे ठरवू शकत नाही, असा दावा शिवसेना पक्षाने केला.

शिवसेना तुमची असल्याचे पुरावे 8 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आव्हान निवडणूक आयोगाने शिवसेनेला केले होते. तेव्हा आयोगाच्या आदेशालाच शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात आव्हान केले होते. ठाकरे गटाचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली. तिच्यावर आता येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेला निकाल होण्याची अपेक्षा आहे.

थोडक्यात बातम्या –

“बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”

संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…

नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More