बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

मुंबई | भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) बहुचर्चीत आणि बहुप्रलंबित ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) गुंता सोडवत, आरक्षणाविना प्रलंबित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले. आता यावरून ओबीसी समाजाची मते आणि मने जिंकण्यांचा खटाटोप भाजप आणि शिवसेना पक्षाने सुरु केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

स्वत:च नसलेले श्रेय घेण्यासाठी भाजप पुढे पुढे करत आहे, असा टोला शिवसेनेने भाजपला लगवाला. तसेच या आनंदात सहभागी होण्याऐेवजी भाजपची मंडळी आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा देखील आरोप शिवसेनेने केला. शिवसेनेने ओबीसी समाजाच्या सामान्य नागरिकांना राजकारणात, सत्ताकारणात सर्वोच्च पदावर नेले, असा दावा शिवसेनेने केला.

तर दुसरीकडे आमच्या शिंदे सरकारने पुढाकार घेतला म्हणून ओबीसींना आरक्षण मिळाले. आमच्या सरकराचा पायगुण चांगला म्हणून हे प्रकरण निकालात निघाले असे भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारने बांठीया आयोग स्थापन केला होता आणि या आयोगाने ओबीसीची माहिती आणि अहवाल तयार केले होते.

दरम्यान, शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद अधिकच चिघळला आहे. त्यात ओबीसी आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More