बलात्कार झाल्यावर कुणी आरोपीला ‘आय लव्ह यू’ म्हणेल का?

नवी दिल्ली | बलात्कार झाल्यानंतर पीडित महिला आरोपीला आय लव्ह यू म्हणेल का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने पीडितेच्या वकिलांना विचारलाय. ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक महमूद फारुखी यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर सुनावणी करताना हा प्रकार घडला. 

याप्रकरणात फारुखी यांनी पीडित महिलेवर जबरदस्ती केल्याचं कुठंही दिसत नाही. उच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिलाय असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने फारुखी यांना दिलासा दिला. 

दरम्यान, पीडित महिलेच्या वकिलांनी दोघे परिचित नसल्याचा तसेच ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या 7 वर्षांच्या शिक्षेचा दाखला दिला होता. मात्र दोघांमध्ये झालेलं ईमेल संभाषण पाहून न्यायालयाने पीडितेचे आरोप फेटाळून लावले.