बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अनिल देशमुखांची संपत्ती परत करा’; सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटाकारलं

मुंबई | राज्यासह देशात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रकरण गाजत आहे. अनिल देशमुख हे सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर 100 कोटी खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अशात सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांना मोठा दिलासा दिला आहे.

सर्वेच्च न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारत देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

योगेश देशमुख आणि शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केल्या होत्या. त्याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयाने ईडीला फटकारत मालमत्ता मुक्त करण्यास सांगितलं असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपावरून ‘ईडी’ने देशमुख कुटुंबीयांची जप्त केलेली मालमत्ता ही 180 दिवसानंतरची कारवाई आहे. कायद्यानुसार अशा प्रकारे 180 दिवसांच्या नंतर मालमत्ता जप्त करता येत नाही.

पोस्ट पाहा – 

 

थोडक्यात बातम्या – 

पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच; इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता

“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”

“राजीनामा देतो पण अटक करु नका”

Pakistan Political Crisis | इम्रान खानचं सरकार पडलं, पंतप्रधान पदावरून अखेर हकालपट्टी

मुंबईचा सलग चौथा पराभव; रोहितचा ‘हा’ हुकमी एक्का ठरतोय फेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More