मुंबई | सरकारी रुग्णालय असो की खासगी मान्यताप्राप्त सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी निशुल्क म्हणजेच मोफत करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याची अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालयांना योग्य दिशानिर्देश देण्याचीही सुचना केली आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने कोरोना चाचणीवरील हा महत्वाचा आदेश दिला. हा आदेश देताना न्यायालयाने काही निर्देशही दिले आहेत.
कोरोना संसर्गाची चाचणी एनएबीएल, जागतिक आरोग्य संघटना WHO किंवा आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोग शाळांमध्ये घेण्यात यावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, याआधी केंद्र सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी 4500 रुपयांचं शुल्क निश्चित केलं होतं. मात्र शशांक देव सुधी यांनी या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले.
ट्रेंडिंग बातम्या-
“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”
‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन
महत्वाच्या बातम्या-
मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता- उद्धव ठाकरे
“काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्या”
‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली