बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका

नवी दिल्ली | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे.

विधानसभा उपाध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आलेल्या 11 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही.

इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी व शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान, सर्व आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्याचीच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने बजावलं आहे. एकनाथ शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 11 जुलै रोजी पार पडणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रात असता तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं”

“मुंबईत घुसू देणार नाही, 72 तास मुंबई विमानतळाला घेराव घालू”

BREAKING | संजय राऊतांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी बोलावलं

आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More