Top News

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

मराठा आरक्षणावर आज पहिल्यांदाच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. घटनापीठासमोर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच न्यायाधीशांची समिती नेमली होती. यावेळी राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी आरक्षणाची जोरदार बाजू मांडली.

पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल, असं या घटनापीठने म्हटलं आहे.

स्थगिती उठवण्याची घाई कशाला हवी. आपल्याकडे अजून वेळ आहे, असं सांगत घटनापीठाने स्थगिती उठवण्यास नकार दिला.

थोडक्यात बातम्या-

2020 मध्ये ‘कोरोना’ नव्हे तर ‘हा’ शब्द ॲानलाईन डिक्शनरीत सर्वाधिक शोधला गेला!

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या…

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या