Top News देश

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा विषय अनेक दिवसांपासून सुरु आहे. यातच मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवत 25 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाचं प्रकरण हे गंभीर आणि मोठं आहे. त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणी केली जाईल, असं कोर्टाने यावेळी सांगितलं आहे. मात्र न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. तसेच या निर्णयामुळे स्थगितीपूर्वची नोकरीभरतीलाही न्यायालयाने नाकारले आहे. त्यामुळे स्थगिती न हटवल्यास 2 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारची बाजू मुलूक रोहतगी यांनी मांडली आहे. मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. स्वतंत्र ईएसबीसी श्रेणी तयार करण्यात आली. या श्रेणीत येणाऱ्यांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्यात आलं. सरसकट नाेकरभरती करण्यास मनाई नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडे अनेक पर्याय आहेत, त्यांचा विशेष बाब म्हणून सरकारने अवलंब करावा ही विनंती. तसेच सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मराठा आरक्षण प्रकरण गांभीर्याने घ्यावं. समाजाचा न्यायप्रकियेवर पूर्णतः विश्वास आहे. आम्ही पुन्हा कोर्टात नवीन अर्ज करु, असं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ

 गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया; म्हणाले…

दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार?, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट

रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू

‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या