बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…आता केंद्र सरकार कमी पडलं असा आरोप आम्हाला करायचा नाही- अशोक चव्हाण

मुंबई | केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा मोठा फटका मराठा समाजाला बसणार आहे. यावर आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या 102व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानं मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

102व्या घटना दुरूस्तीनंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोधकांनी कितीही राजकारण केले असले तरी आम्ही या विषयावर राजकारण करणार नाही. पूनर्विलोकन याचिका करताना केंद्र सरकार कमी पडले, असा राजकीय आरोप आम्ही करणार नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

याबाबत राज्यातील सर्व पक्षांनी आता केंद्र सरकारला संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्यांचे अधिकार व 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथील करण्याबाबत घटना दुरुस्ती करावी अशी मागणी केली पाहिजे. कारण राज्यांना केवळ अधिकार मिळून उपयोग नाही तर आरक्षण मर्यादा शिथील करणं देखील आवश्यक आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये- चंद्रकांत पाटील

“गोपीचंद पडळकर तळागाळातून आलेले, त्यांनी जे भोगलं ते त्यांनी पोटतिडकीने मांडलं”

“दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा”

नागरिकांनो सावधान! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More