बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

नवी दिल्ली | स्किन टू स्किन स्पर्श नसेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही कारण तेव्हा त्वचेशी संपर्क येत नाही, असा वादग्रस्त निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाचा हा वादग्रस्त निकाल फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

स्पर्शाचा अर्थ स्किन टू स्किन संपर्कापर्यंत मर्यादित ठेवल्याने संकुचित आणि मुर्खपणा ठरेल आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करण्याचा कायद्याचा हेतू नष्ट होईल, असं न्यायमूर्ती यू यू ललित, एस रविंद्र भट आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी मुलीच्या त्वचेला स्पर्ष केला की नाही यापेक्षा लैंगिक हेतू महत्वाचा असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला फटकारलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीचे स्तन कपडे न काढता त्वचेच्या संपर्काशिवाय पकडणे या गुन्ह्याला लैंगिक अत्याचार म्हणत नाहीत, असा निर्णय देत एका पुरूषाची निर्दोश सुटका केली होती. या वादग्रस्त निर्णयानंतर अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाळ, राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

POSCO कायद्याच्या कलम 7 अंतर्गत मुलीचे कपडे न काढता शरीराला स्पर्श न करणे हा लैंगिक छळ होत नसल्याचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अखेर मागे घेतला आहे. भले त्वतेला स्पर्श केला नसला तरी हे कृत्य खेदजनक आहे. आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा मानतो, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या शरीराला हात लावलेल्या दोन दोषी आरोपींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

थोडक्यात बातम्या-

“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”

निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More