बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली | ओबीसी आरक्षणाप्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुनावणी पार पडली. मागासवर्ग आयोगाने सादर केलेला आहवाल सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा अहवाल नाकारल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी आरक्षणासंदर्भातील अहवाल नाकारला. पुढील निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण लागू करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देता येणार नाहीये. त्यामुळे आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत चर्चा करून भूमिका स्पषट केली जाणार आहे. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच भूमिका आजही असल्याचं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मविआच्या आमदाराचं ‘खाली डोकं वर पाय’, अभिभाषण अर्ध्यावर सोडून राज्यपाल माघारी

“अटकेत असलेला मंत्री मंत्रिपदावर कसा?, बाळासाहेब असते तर…”

‘नवाब मलिक हाय हाय’, अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधक आक्रमक

मोदी व पुतिन यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा, युक्रेनमधील भारतीयांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

“भाजप फक्त हूल देतं, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More