मोठी बातमी! बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर सुरू झालेलं सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शिवसेनेकडून अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा लावून धरत बहुमत चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावली आहे.
उद्या सकाळी 11 ते 5 यावेळेत बहुमत चाचणी होणार आहे. बहुमत चाचणीवर स्टे लावता येणार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तब्बल 3 तासांच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. तर शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील उद्या मुंबईत दाखल होतील.
थोडक्यात बातम्या-
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांविषयी शनिवारी मार्गदर्शन सत्र, वाचा सविस्तर
सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर
‘…तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये’, शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात
एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार, राजकीय हालचालींना वेग
Comments are closed.