मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याबाबत देशातील एकूण 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका (Supreme Court) दाखल केलेली. या याचिका न्यायालयाने फेटाळत केंद्र सरकारला (Central Goverment) मोठा दिलासा दिलाय.

सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज लंच ब्रेकनंतर सुनावणी घेण्यात आली. 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजकीय पक्षांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून युक्तीवादाला सुरुवात झाली.

ईडी आणि सीबीआईच्या प्रकरणात देशात 6 पटीने वाढ झाली आहे. मात्र फक्त 23% लोकांना शिक्षा झाली आहे. याद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

दरम्यान, कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय फक्त राजकीय नेतेमंडळींसाठी आम्ही आदेश देऊ शकणार नाही. न्यायालयानं असं केल्यास ते कदाचित धोकादायक ठरू शकेल, असं सरन्यायाधिशांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-