बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार

मुंबई | शिवसेनेतून बंड करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या एकूण 40 आमदारांपैकी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकरवी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India)आव्हान दिले होते.

शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे यांच्या भविष्याची आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे गटात पलायन केलेल्या आमदारांना जर न्यायालयाने अपात्र ठरविले तर शिंदे सरकार अल्पमतात येणार आहे आणि त्यामुळे त्यांचे नवनिर्वाचित सरकार कोसळू सुद्धा शकते. आणि जर हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला तर शिवसेनेचा आणि पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम रहाणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष्यांच्या अधिकारांत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत शिवसेना पक्षाच्या व्हिप विरोधात मते करणे या याचिकांवर आज न्यायालयात सरन्यायाधिश एन. व्हि. रमण्णा (N. V. Ramanna) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांचा ह्या खंडपीठात सामावेश आहे.

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या याचिकेबरोबरच ओबीसी आरक्षणाची सुनावणी देखील आजच होणार आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका (Municipal Corporation Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकांत ओबिसी आरक्षण लागू होणार की नाही? याचा आज न्यायालयात निकाल आहे.

थोडक्यात बातम्या –

‘पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे,आताचे सुलतान शिवसेना पाडतात’; खासदार फोडल्यानंतर सेना आक्रमक

मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका

नवाब मलिकांना ईडीचा दणका, तुरूंगातील मुक्काम वाढणार?

फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!

“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More