बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारचं लसीकरण धोरण योग्यच, ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केलंय”

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशाला ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह अन्य उच्च न्यायालयांमध्ये दाखल याचिकांवर सुनावणी सुरू असून लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असं केंद्र सरकारने म्हटलंय.

केंद्र सरकारचं लसीकरण धोरण योग्य आहे. ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केले आहे. त्यात दुरुस्तीसाठी फारसा वाव नाही. तरी केंद्राच्या लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलं आहे.

सध्या देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वय वर्षे 18 ते 44 आणि वय वर्षे 45 च्या पुढे असे दोन गट आहेत. हे दोन गट या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निश्चित करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील जागतिक पातळीवरील संकटाचा सामना करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर लढत असताना न्यायव्यवस्थेने त्यात हस्तक्षेप करू नये, असं केंद्राने नमूद केलंय.

दरम्यान, कार्यकारी मंडळालाही काही अधिकार घटनेने दिले आहेत. त्यांच्या कामकाजावर आणि निर्णयक्षमतेवर न्यायालयांनी विश्वास ठेवावा, असं केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

राहुलचा मृत्यूआधीचा व्हिडीओ शेअर करत पत्नीने रूग्णालयावर केले आरोप, मरणापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

“भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला”

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

“मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन चि दिले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More