बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका!

नवी दिल्ली | ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारच्या (State Government) मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयानं केलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासोबतच इम्पेरिकल डेटा (Imperial Data) देण्याची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला इम्पेरिकल डेटा देण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य सरकारने याचिकेमार्फत केली होती. मात्र आज बुधवारी ही मागणी फेटाळली आहे.

दरम्यान, राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी किमान 6 महिन्यांचा वेळ देण्यात यावा. तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशीही मागणी रोहतगी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘सध्याचे हेच हिंदू तेव्हा पळून गेले होते’; संजय राऊतांचा घणाघात

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘आईच्या इज्जतीची पर्वा आहे की नाही’; …म्हणून अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

महेश मांजरेकरांनी सोडला ‘बिग बॉस’; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More