बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | देशातील पत्रकार, राजकीय नेते, उद्योगपती, सत्ताधारी गटातील मंत्री यांच्या हेरगिरी प्रकरणानं देशात खळबळ माजवली होती. केंद्र सरकारनं पेगासस नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील नागरिकांची हेरगिरी केल्याचा आरोप केंद्र सरकारवर विरोधक आणि पत्रकारांनी केला होता. यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला होता. केंद्र सरकारकडून असं कोणतही कृत्य केलं गेलं नसल्याचं म्हटलं होतं. पण आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात महत्त्वपुर्ण निकाल दिला आहे.

सरन्यायाधीश एस व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ पेगासस प्रकरणाची सुनावणी करत आहे. यात आज महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून तीन सदस्यीय विशेष समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमुर्ती आर व्ही रविद्रंन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत आलोक जोशी आणि संदीप ओबेराॅय यांचा देखील समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत. परिणामी आता पेगासस प्रकरणावरून देशात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पहिल्यांदा पेगासस प्रकरण जगासमोर आणलं होतं. त्यानंतर देशातील विरोधी पक्षाचे नेते, काही पत्रकार, सत्तधारी गटातील नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचं नावं या हेरगिरी केलेल्या यादीत आल्यानंतर देशभर वातावरण ढवळून निघालं होतं.

दरम्यान, हेरगिरी केलेल्या नावांमध्ये केंद्र सरकारचे विद्यमान रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, काॅंग्रेस खासदार राहुल गांधी, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या नावाचा प्रामुख्यानं समावेश आहे. परिणामी आता या प्रकरणात या समितीकडून नेमके काय खुलासे होतात याकडं देशाचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More