बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई | महाराष्ट्र सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत मराठा आरक्षण दिलं होतं. मात्र, तो कायदाच सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला होता. तसेच एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असल्याचं म्हटलं होतं. यानंतर केंद्र सरकारने  मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 

ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाच्या वतीने जी रिव्ह्यू पीटीशन करण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

पाच न्यायाधिशांच्या बेंचनं जो निर्णय दिला होता तोच निर्णय आता कायम ठेवण्यात आला आहे. या याचिकेवर पुनर्विचार करण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ही याचिका विनोद पाटील यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर विनोद पाटील म्हणाले की, आता केंद्र सरकारने याबाबत कायदा करावा किंवा राज्य सरकारने कायदा करावा. नाहीतर केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून निर्णय घ्यावा.

थोडक्यात बातम्या- 

‘गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पडळकरांना पाठींबा

गोपीचंद वि. राष्ट्रवादी संघर्ष पेटला??; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

अजित पवारांना मोठा झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीची संपत्ती जप्त, इतक्या कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More