अनिल देशमुखांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा(Anil Deshmukh) 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court) एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. परंतु देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका सीबीआयनं(CBI) सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) दाखल केली होती.

सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयची याचिका फेटाळत देशमुखांच्या जामीनाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळं देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानं देशमुख बुधवारी तुरूंगाबाहेर येणार आहेत. देशमुख मंगळवारी ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहेत.

देशमुखांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानं राष्ट्रवादीच्या आणि देशमुखांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे.

दरम्यान, देशमुखांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी झाल्यानंतर देशमुखांवर गुन्हा दाखल झाला होता.

महत्वाच्या बातम्या-